‘माँ’च्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात; काजोलने घेतले दक्षिणेश्वर कालीमातेचे दर्शन, म्हणाली “ही भूमिका माझ्या कारकिर्दीतील सर्वात ताकदवान

‘माँ’च्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात; काजोलने घेतले दक्षिणेश्वर कालीमातेचे दर्शन, म्हणाली “ही भूमिका माझ्या कारकिर्दीतील सर्वात ताकदवान

कोलकात्याच्या प्रसिद्ध दक्षिणेश्वर काली मंदिरात अभिनेत्री काजोल यांनी दर्शन घेऊन आपल्या आगामी चित्रपटाच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली. भव्य आणि भक्तिभावाने उजळलेल्या मंदिरात पाय ठेवताच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांती आणि आत्मविश्वास झळकत होता. काजोलने तिच्या पारंपरिक साडीतील उपस्थितीने तिथे उपस्थित असलेल्या भाविकांचे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. देवीकडे नतमस्तक होताच तिने भावनिक स्वरात एक बोलके विधान केलं – “ही भूमिका माझ्या कारकिर्दीतील सर्वात ताकदवान आहे.” या शब्दांमागे केवळ अभिनय नव्हे तर एका स्त्रीच्या अंतरात्म्याची सुद्धा साक्ष पटत होती.

‘माँ’ या आगामी चित्रपटातून काजोल एका अशा पात्रात झळकणार असून जे केवळ मातृत्वाचं प्रतीक नाही, तर सत्य, संघर्ष आणि श्रद्धेचा विजयही दर्शवतं. चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णाल फुरिया यांनी केलं असून लेखन सैविन क्वाड्रस यांचं आहे. या कथेत चांगल्याविरुद्ध वाईट यांच्यातील सनातन संघर्ष अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडला गेला आहे. काजोल सोबत रोनित रॉय आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात पाहायला मिळणार आहेत. जिओ स्टुडिओज आणि देवगण फिल्म्स प्रस्तुत ‘माँ’ या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण आणि ज्योती देशपांडे यांनी केली असून कुमार मंगत पाठक हे सहनिर्माते आहेत. २७ जूनला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *